Share

मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा घेणार का? – बजरंग सोनवणे

Bajarang Sonawane यांनी सांगितले की, वाल्मिक कराड ‘गुन्हेगारी टोळीचा प्रमुख’ असून, त्याच्या टोळीत 11 जण असून, सुमारे 100 लोक त्याच्या प्रभावाखाली कार्यरत. टोळीला राजकीय आश्रय असल्याचा गंभीर आरोप करत, मी त्याचे नाव घेण्यास घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? असा सवाल उपस्थित केला.

Published On: 

Prakash Mahajan on Dhananjay Munde, Suresh Dhas and Bajrang Sonwane

🕒 1 min read

बीड | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील  (Santosh Deshmukh murder case)  मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुढे नेत आरोपपत्र दाखल केले असून, वाल्मिक कराडला हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून घोषित केले आहे. आरोपपत्रात कराडविरोधात ठोस पुरावे सादर करण्यात आले असून, पाच गोपनीय साक्षीदारांनी त्याच्या विरोधात जबाब दिला आहे. यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.

Bajarang Sonawane यांची तीव्र प्रतिक्रिया

या घटनेवर भाष्य करताना खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे वास्तव स्पष्ट झाले आहे. वाल्मिक कराड ‘गुन्हेगारी टोळीचा प्रमुख’ असून, त्याच्या टोळीत 11 जण असून, सुमारे 100 लोक त्याच्या प्रभावाखाली कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच, या टोळीला राजकीय आश्रय असल्याचा गंभीर आरोपही केला. मी त्याचे नाव घेण्यास घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.

सोनवणे असेही म्हटले की, “या प्रकरणात ED चौकशी आवश्यक आहे. गुन्हेगारीचा मुळापर्यंत जाऊन तपास व्हायला हवा. तसेच, पोलिस अधिकारी महाजन आणि पाटील यांना सहआरोपी म्हणून तपासात समाविष्ट करण्याची मागणी केली. या अधिकाऱ्यांनी आरोपींना मदत केली असून, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

Dhananjay Munde नाव न घेता टीका 

सोनवणे म्हटले की, “अधिवेशन सुरू असताना एका व्यक्तीने प्रतिक्रिया देत ‘वाल्मिक कराड माझा माणूस आहे’ असे जाहीरपणे सांगितले होते. योग्य चौकशी केल्यास त्यापर्यंत पोहोचता येईल.” त्यांनी पोलिसांच्या तपासाचे कौतुक केले, पण गुन्हे सिद्ध होण्यासाठी आवश्यक पुरावे प्रभावीपणे सादर होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

वकील उज्ज्वल निकम आणि सतीश माने शिंदे यांच्या माध्यमातून फिर्यादीच्या बाजूने हा खटला लढवला जाणार आहे. दोषींना शिक्षा होईपर्यंत माघार घेणार नाहीत आणि गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा भेटून या प्रकरणाच्या योग्य तपासाची मागणी करणार आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचवावा, अशी ठाम भूमिका खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडली आहे.

परळीतील 109 अज्ञात मृतदेहांबाबत गंभीर आरोप

परळीमध्ये 109 अज्ञात मृतदेह आढळल्याचा धक्कादायक दावा करत सोनवणे यांनी प्रशासनावर टीका केली. त्यांनी विचारले की, “या मृतदेहांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याची कोणतीही स्पष्टता नाही. हे हृदयविकाराने गेले, की हत्या झाली, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)