🕒 1 min read
Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) तीन महिने पूर्ण होत आली आहेत. तरीही त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही. याप्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Criminal Investigation Department) पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास पूर्ण करण्यात आला आहे.
नुकतेच गुन्हे अन्वेषण विभागाने मकोका न्यायालयात दीड हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले असून यामध्ये वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच मुख्य आरोपी असल्याचे सांगितले आहे. देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली? कट कुणी रचला? यासारख्या अनेक माहितीचा उलगडा झाला आहे.
७ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मिक कराड याला सुदर्शन घुले याने फोन केला होता. त्यावेळी कराड याने सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला असे सांगितले होते की कुणीही उठतोय आणि आपल्या आड येत आहे. हे जर असेच सुरू राहिले तर आपण भीकेला लागू, असे कराड म्हणाला होता.
आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. त्यामुळे आता मागचं पुढचं काहीच बघू नका. जो कुणी यामध्ये आडवा येईल त्याला आडवा करा. कामाला लागा आणि विष्णू चाटेशी बोलून घ्या. तो तुम्हाला मदत करेल, अशा सूचना वाल्मिक कराडने सुदर्शन घुले याला दिल्या होत्या.
Walmik Karad is mastermind behind the Santosh Deshmukh murder case
दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाने वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार सांगितला असल्याने त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. वाल्मिक कराड याला याप्रकरणी न्यायालय कोणती शिक्षा सुनावणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Datta Gade चा आणखी एक कारनामा समोर, गावकरी सहजासहजी घेत नव्हते पंगा
- Walmik Karad असा ठरला आरोपी क्रमांक 1; व्हिडीओ कॉल, 5 गोपनीय साक्षीदार, अन् ‘ती’ भेट
- Dhananjay Munde यांचा आरोपींना वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न- अंजली दमानिया









