Anjali Damania । बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचा दावा सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केला आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील आरोपींवर आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
Anjali Damania यांचा आरोप
अंजली दमानिया यांनी सांगितले की, “या प्रकरणामध्ये राजकीय दबाव होता, जो धनंजय मुंडे यांचा होता. या प्रकरणाची सुरूवात 29 नोव्हेंबरला झाली, जेव्हा वाल्मिक कराड याने सुदर्शन घुले याच्या फोनवरून खंडणी मागितली. 6 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्यावर हल्ला झाला. 7 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात संतोष देशमुख यांना ‘काटा’ काढण्याबाबत चर्चा झाली. 8 डिसेंबरला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी तिरंगा हॉटेलमध्ये भेट घेतली आणि संतोष देशमुख यांना ‘संपवण्याची’ योजना आखली.”
मला हे सगळं बघून इतका राग इतकी चिड येते की ही माणसं नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे, असे Anjali Damania म्हणाल्या.
Anjali Damania VS Dhananjay Munde
अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड ( Walmik Karad ) याला फाशीची शिक्षा देण्याची आणि मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “धनंजय मुंडे यांनी आरोपींना वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. अशा प्रकारच्या सिंडिकेटला पाठीशी घालणाऱ्या मंत्रींचा राजीनामा त्वरित घेतला पाहिजे. जर त्यांना लाज वाटत असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांना बडतर्फ करावे.”
महत्वाच्या बातम्या