Rupali Thombare । पुणे स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बस बलात्कार प्रकरणामुळे (Pune rape case) संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
दत्ता गाडे याच्या वकिलांनी हा अत्याचार नाही, तर दोघांमध्ये संमतीने संबंध झाल्याचा दावा केला होता. या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी आता अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत धक्कादायक खुलासा केला आहे.
Rupali Thombare post on Facebook
रुपाली ठोंबरे फेसबुकवर लिहितात, “या प्रकरणात संबंध संमतीने झाले होते. पण व्यवहाराचे पैसे दिले नाहीत, म्हणून हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे शहराला नाहक बदनामी सहन करावी लागली. म्हणून याचा प्रचंड खेद वाटतो,” असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
“ज्यावेळी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा DCP गिल यांनी माझ्याशी संवाद साधला. मॅडम, तुम्ही आंदोलन करणार असाल किंवा आरोपीला काळे फासणार असाल, तर कृपया तसे करू नका. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीवर आंदोलन करणार नाही. आधी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेईन आणि नंतरच भूमिका मांडेन,” असेही रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
Rupali Thombare reaction on Pune Rape Case
दरम्यान, रुपाली ठोंबरे यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुणे अत्याचार प्रकरणी केलेल्या दाव्यामुळे विरोधक रुपाली ठोंबरे आणि अजित पवार गटावर निशाणा साधू शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले