Share

“मला आणि Govinda ला वेगळं करण्याचा प्रयत्न..”; घटस्फोटाच्या चर्चांवर Sunita Ahuja यांची पहिली प्रतिक्रिया

Rumors of Govinda and Sunita Ahuja divorce have been doing the rounds for the past few days. Now Sunita Ahuja has disclosed this.

by MHD

Published On: 

Govinda wife Sunita Ahuja Reaction on Divorce Rumors

Sunita Ahuja । बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. हे जोडपे लवकरच घटस्फोट (Govinda – Sunita Ahuja Divorce Rumors) घेणार आहेत, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. यामुळे गोविंदाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सुनीता आहुजा यांनी एका मुलाखतीदरम्यान गोविंदा वेगळ्या घरात राहत असून मागील 12 वर्षांपासून आपण वाढदिवस एकट्याने साजरा करत असल्याचा खुलासा केला होता. यामुळे घटस्फोटाच्या अफवांनी जोर धरला आहे. यावर आता सुनीता आहुजा यांनी खुलासा केला आहे.

“राजकारणात गोविंदा हे आले त्यावेळी अनेक नेते घरी येत असायचे. त्यावेळी आमची मुलगी वयात येत होती. आम्ही घरात शॉर्ट्स वगैरे घालायचो. पण बाहेरच्या लोकांसमोर असे फिरणं मला आवडत नव्हत. त्यामुळेच आम्ही वेगळा फ्लॅट घेतला होता, त्याच ठिकाणी गोविंदा मीटिंग घेत होते, असा खुलासा सुनीता आहुजा यांनी केला आहे.

पुढे सुनीता आहुजा म्हणाल्या की, “मला आणि गोविंदाला एकमेकांपासून कोणीच वेगळे करू शकत नाही. जर आम्हाला वेगळे करणारे कोण असेल तर त्यांनी समोर यावे,” असे आव्हान सुनिता आहुजा यांनी बोलताना दिले आहे.

Divorce rumours with Govidna his wife Sunita Ahuja revealed truth

दरम्यान, सुनीता आहुजा यांच्या प्रतिक्रयेनंतर गोविंदा आणि सुनीता आहुजा हे जोडपे घटस्फोट घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच यामुळे घटस्फोटाच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. सध्या सुनीता आहुजा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही