Datta Gade । पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणी (Swargate bus depot rape case) शिवाजीनगर न्यायालयाने दत्ता गाडे याला काल 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची सध्या चौकशी सुरु आहे. या दरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Crime in Pune)
आरोपी दत्ता गाडे याची गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने मागील वर्षभरातील ठिकाणांची सीडीआरच्या माध्यमातून माहिती घेतली. या माहितीमध्ये दत्ता गाडे याचा शिर्डी, स्वारगेट, पंढरपूर, उज्जैन, शनिशिंगणापूर, श्रीगोंदा, दौंड येथील रेल्वे आणि बस स्थानकावर जास्त वावर होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune Rape Case)
दरम्यान, या प्रकरणी दत्ता गाडेच्या परिचयातील एका वकिलाने धक्कादायक दावा केला आहे. आरोपी आणि पीडितेची महिनाभरापासून ओळख होती. त्यांच्यामध्ये घटनेवेळी साडेसात हजारांचा पैशांचा व्यवहार झाला,” असा दावा अॅड. सुमीत पोटे यांनी केला आहे.
“जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज व्यवस्थित पाहिले असेल तर संबंधित ती तरुणी आरोपीच्या पाठीमागे जात आहे. दत्ता गाडे तिला घेऊन जात असताना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करताना दिसत नाही. अवघ्या 50 मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी तिथे गेली नाही,” असेही पोटे म्हणाले आहेत.
Rape case in Swargate bus depot
दरम्यान, सध्या पोलिसांकडून दत्ता गाडे याची पोलीस चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान आणखी कोणती माहिती समोर येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. परंतु, स्वारगेट बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना कशी होऊ शकते? असा सवाल अजूनही अनेकांच्या मनात पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :