Pune Rape Case । स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणातील (Swargate Rape Case) आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला शिरूरमधील गुनाट गावकऱ्यांच्या मदतीने पुणे पोलिसांनी अटक केले आहे. काल याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणात नेमकं काय घडलं? याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 25 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकामध्ये आली होती. यावेळी दत्ता गाडे बस स्थानकाच्या परिसरामध्ये फिरत होता.
त्याचवेळी त्याचे लक्ष पीडित तरुणीवर गेले. तिच्याजवळ जाऊन त्याने ताई कुठे चाललीस तू? अशी विचारणा केली. यावेळी तरुणीने मला फलटणला जायचे आहे, अशी माहिती दिली. तरुणीला आरोपीने लगेच फलटणला जाणारी दुसरीकडे बस लागली आहे, असे सांगितले.
आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन करून तिला बसमध्ये नेले. तरुणीला बसमध्ये कुणीच दिसत नसल्याने तिने आरोपीला सांगितलं की, दादा मला बाहेर जाऊ द्या, मला घरी जायचं आहे. तरुणीने विनवणी करूनही आरोपीने तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.
Police told thrilling inside story in Swargate Rape Case
दरम्यान, दत्ता गाडे याची गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने मागील वर्षभरातील ठिकाणांची सीडीआरच्या माध्यमातून माहिती घेतली आहे. या माहितीमध्ये गाडे याचा शिर्डी, स्वारगेट, पंढरपूर, उज्जैन,शनिशिंगणापूर, श्रीगोंदा, दौंड येथील रेल्वे आणि बस स्थानकावर जास्त वावर होता, अशी माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :