Datta Gade । पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार (Swargate Rape Case) केल्याप्रकरणी पोलिसांनी दत्ता गाडे या आरोपीला अटक केली आहे. त्याला १२ मार्चपर्यंत कोठडी सुनावली असून त्याच्याकडून सखोल चौकशी केली जात आहे.
चौकशीदरम्यान याप्रकरणी दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच आज पुन्हा एकदा चौकशीदरम्यान आरोपी दत्ता गाडेबद्दल अशीच माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पोलिसही हादरले आहेत.
पोलिसांच्या वेषामध्ये असणाऱ्या दत्ता गाडे याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Datta Gade viral photo on Social media) झाले आहेत. गाडे हा स्वारगेट पोलीस ठाणे आणि आसपासच्या परिसरात स्वत: पोलीस असल्याचे भासवत अनेक तरुणींना फसवायचा, अशी माहिती समोर आली आहे.
इतकेच नाही तर मागील वर्षी दत्ता गाडे याला स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्याच्या फोन नंबरचेही विश्लेषण केले आहे.
Photo of Datta Gade in police uniform
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला असून जर त्याच्याविरुद्ध कोणाची तक्रार असेल तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. त्यामुळे आता गाडेचे दररोज किती कारनामे समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :