Share

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर Devendra Fadnavis कारवाई करणार का?

Nana Patole criticizes Devendra Fadnavis over Dhananjay Munde

मुंबई ।  नाना पटोले यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप करत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. “समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई केली जाते, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई का केली जात नाही?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “भाजपा सरकार संविधानाला न मानता धर्माच्या आधारावर भूमिका घेत कारवाई करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी इतिहासातील काही घटनांचा उल्लेख केला, मात्र वर्तमानात छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, याचा विचार ते करत नाहीत.”

Devendra Fadnavis take action against those who insult Chhatrapati Shivaji Maharaj?

पटोले पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा मुद्दा उपस्थित होताच भाजपाचे सदस्य सभागृहात गोंधळ घालतात. भाजपाचे आमदार अशा व्यक्तींचे समर्थन करत आहेत का?” असे सवाल त्यांनी केले.

यवतमाळ जिल्ह्यातील एका महिलांच्या कार्यक्रमातील भ्रष्टाचाराबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, “या गैरव्यवहाराला तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. माजी मुख्यमंत्र्यांविरोधात मुख्य सचिवांनी अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र सादर करणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना आहे. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला जाईल आणि सरकारने त्यावर उत्तर द्यावे.”

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, “भाजपाने राहुल गांधी यांच्याविरोधात झटपट कारवाई करत त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आणि सरकारी घर ताबडतोब खाली करण्यास सांगितले. मग माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत वेगळी भूमिका का घेतली जाते? शिक्षा झाल्यानंतरही त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय का घेतला गेला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नाना पटोले यांनी भाजप सरकारला “गोंधळी सरकार” असे संबोधले आणि अधिवेशन चालवण्याची जबाबदारी सरकारची असली तरी गोंधळ घालणाऱ्या पक्षामुळे सभागृहात योग्य चर्चा होत नसल्याचे सांगितले. “सरकारने छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस ( Devendra Fadnavis ) दाखवावे,” असे आव्हानही त्यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकरवर कारवाई करण्याचे धाडस Devendra Fadnavis दाखवावे. भाजपाच्या मूळ विचारसरणीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now