Manikrao Kokate । राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप होता. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड सुनावला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. परंतु, न्यायालयाने शिक्षा देऊनही सरकारने कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही. यामुळे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारची विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोंडी केली.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण मंत्रिमहोदयासंदर्भात जे मांडत आहात. त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केली आहे. क्लोज फॉर ऑर्डर ठेवण्यात आली आहे. कोर्टाची ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील,” असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
तसेच फडणवीसांनी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या निधनाबद्दल मांडलेल्या शोक प्रस्तावावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. “देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारण केल्या अशा मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असे वाटले नव्हते,” असे सभागृहात उत्तर दिले आहे.
Devendra Fadnavis Statement on Manikrao Kokate resignation demand
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा विरोधकांकडून मागितला जात आहे. आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याचे पडसाद दिसत आहे. त्यामुळे याप्रकरणी सरकार काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :