Pune Rape Case । स्वारगेट बलात्कार प्रकरणातील (Swargate Rape Case) आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची चौकशी सुरु असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
आरोपीला पकडून देणाऱ्याला पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे दत्ता गाडेला अटक केल्यानंतर एक लाखाचे बक्षीस कोणाला देणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. याबाबत आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“ज्या व्यक्तीने ट्रिगर माहिती दिली, म्हणजे शेवटची माहिती दिली व्यक्तीला १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. संपूर्ण गुनाट ग्रामस्थांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे,” अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे.
“तपासादरम्यान ४०० ते ५०० ग्रामस्थांचा चांगला पाठिंबा मिळाला. तसेच श्वान पथकाने देखील चांगली कामगिरी केली. ड्रोनने आरोपीचे लोकेशन समजले. दत्ता गाडे याला १.१० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं,” अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे.
Pune Police announces reward of Rs 1 lakh
आरोपीला पकडल्यावरुन ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली होती. यावरदेखील अमितेश कुमार यांनी वक्तव्य केले आहे. “याप्रकरणी कोणताही श्रेयवाद नाही. ही संयुक्त कारवाई आहे,” असे स्पष्टीकरण अमितेश कुमार यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या :