Datta Gade । पुणे शहरातील स्वारगेट (Pune Rape Case) या अतिशय गजबजलेल्या एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर दत्ता गाडे (Datta Gade) याने अत्याचार केला. आज त्याला गुनाट या गावातून अटक करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहे.
सध्या दत्ता गाडे याची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यादरम्यान, दत्ता गाडे कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय आहे? असा सवाल सगळ्यांना पडला आहे.
Who is Datta Gade?
दत्ता गाडे याच्याविरोधात पुणे आणि अहिल्यानगर पोलीस ठाण्यात अनेक चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. सोनसाखळी चोरीचीही त्याच्यावर नोंद आहे. इतकेच नाही तर २०१९ मध्ये तो एका चोरीच्या प्रकरणातून तुरुंगातून जामिनावर सुटला असून २०२४ मध्ये पुण्यातच त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दत्ता गाडे याची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य आहे. त्याला एक आठ वर्षाचा मुलगा असून त्याचे आई-वडील शेतात काम करतात. त्याला एक भाऊ आहे. गाडेची पत्नी खेळाडू असून त्या काही वर्षापूर्वी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत होत्या.
स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर (Swargate Rape Case) गाडेला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी शिरूर येथील गुनाट गावात उसाच्या शेतात शोध घेण्यासाठी श्वान पथक आणि ड्रोनचा वापर करून 13 पथके तैनात केली. आज पहाटे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
D. Y. Chandrachud statement on Pune Rape Case
या घटनेवर भारताचे माजी मुख्य सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निर्भया बलात्कार प्रकरण झाल्यानंतर कायद्यात अनेक बदल केले. पण कायद्याच्या माध्यमातूनच अशा घटना कमी करता येणार नाही. मोठ्या प्रमाणात महिला नोकरी, शिक्षणासाठी घरापासून दूर जाऊन काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येक स्तरावर महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे,” असे मत डी. वाय चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे.
चौकशीदरम्यान, दत्ता गाडे याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले, असा दावा दत्ता गाडे यांनी केला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याप्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :