Pune Rape Case । स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील (Swargate Rape Case) आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) हा पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर आज मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला पोलिसांनी अटक केले. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.
अशातच याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे बलात्कार प्रकरणात पोलिसांना गावकऱ्यांकडून मोठी माहिती मिळाली, याच माहितीच्या आधारे दत्ता गाडेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पण दत्ता गाडेला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे (Ganesh Gavhane) या तरुणाने एका व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
“मागील 3 दिवसांपासून पोलिस आणि गुनाट गावातील लोक दत्ता गाडेचा शोधत होते. रात्री १० वाजता आरोपीची चाहूल लागली होती. त्यानंतर सर्व तरुण आरोपीचा शोध घेत होते. मी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर काही पोलिसांनी त्याला माझ्या हातातून हिसकावून घेतला,” असा आरोप गणेश गव्हाणे याने केला आहे.
“पोलिसांनी तपास करताना माझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला. भावाला मारल्याच्या रागातून आम्ही आरोपीला शोधले. गावात ज्या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवतो तेथील चंदनवस्तीच्या परिसरात गाडे फिरत होता,” असे गणेश गव्हाणे याने स्पष्ट केले.
Ganesh Gavhane on Pune Police
“मी स्वत: आरोपी दत्ता गाडे याला पाहिले. यावेळी तो पळत असताना मी त्याला पकडलं आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली,” असा खुलासा गणेश गव्हाणे याने केला. दरम्यान, गणेश गव्हाणे याच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :