Share

“आजकाल लोक फोटो काढतात अन्….” Chhagan Bhujbal यांचं पुण्यातील घटनेवर मोठं वक्तव्य

by MHD
Chhagan Bhujbal reaction on Pune Rape Case

Chhagan Bhujbal । स्वारगेट बलात्कार प्रकरणाचे (Swargate Rape Case) तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या दरम्यान ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर केले होते.

याप्रकरणावरून राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “महाराष्ट्र राज्याला खूप मोठी संस्कृती असून अशा घटना होणार नाहीत, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येक माणसांनी प्रयत्न करावे. पोलिसांनी देखील शासन करायला पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो,” असे भुजबळ म्हणाले. (Pune Rape Case)

“आजकाल लोक फोटो काढतात आणि निघून जातात. लोकांना रस्त्यावर कोयत्यांनी मारले जाते. लोक फक्त व्हिडिओ काढतात, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न कोणी करत नाही. पुण्यातील घटना फारच विचित्र आहे. अशा गोष्टी होणार नाही, यासाठी दक्षता घेणे खूप गरजेचे आहे,” असा सल्ला भुजबळ यांनी दिला.

पुढे भुजबळ म्हणाले की, “शक्ती कायद्यामध्ये खरोखर किती अंतरभाव आहे, तो पहावा लागेल. कायदा तर कडक असला पाहिजे. पण लोकांनी अशा गोष्टींमध्ये सहज घेता कामा नये. आपल्या समाजात अशा गोष्टींना थारा देऊ नये,” असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

Chhagan Bhujbal on Pune Rape Case

“बसमध्ये लाईटची व्यवस्था करावी, बंद पडलेल्या बसेस काढल्या पाहिजे. गार्ड देखील ठेवले पाहिजेत. जर तुमचे गार्ड नसतील तर लोक टायरपासून सगळंच घेऊन जातील. जिथे सिक्युरिटी नसते त्याच ठिकाणी अशा घटना होतात,” असा दावा भुजबळ यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या :

Datta Gade, the accused in the Swargate rape case, has been arrested by the police. Now Chhagan Bhujbal has made a big statement in this matter.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now