Share

मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर हल्लाबोल, ‘याला नेपाळ-नागालँडकडे सोडा!’

Manoj Jarange Patil attacks Chhagan Bhujbal, calling him ‘forgetful minister.’

Published On: 

Chhagan Bhujbal took oath as minister and directly blamed Manoj Jarange for harming Maratha community. Jarange had earlier criticized Bhujbal's inclusion in cabinet.

🕒 1 min read

जालना, ता. १९: मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांच्यातील शाब्दिक युद्ध आता अधिकच धारदार झाले आहे. छगन भुजबळ यांनी लातूरमध्ये ओबीसींच्या मेळाव्यात ‘आधी आम्ही संपू, मग तुम्ही काही करा’ असे विधान केले होते. त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर बोचरी टीका केली आहे. ‘तुमच्या आरक्षणावर कोणी अतिक्रमण केले? या विसरभोळ्या मंत्र्याला नेपाळ किंवा नागालँडकडे सोडायला हवे,’ अशा शब्दांत जरांगे पाटलांनी हल्लाबोल केला आहे.

भुजबळ यांनी लातूरमध्ये ओबीसी समाजातील भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी बलिदान देण्याची वेळ आल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी भुजबळांवर जोरदार पलटवार केला. ‘तू ३२ टक्के खातोस, असा मंत्री देशात कोणी आहे का? आतापर्यंत तू आमचे आरक्षण खाल्ले आहेस आणि तेच आम्ही परत घेत आहोत. गरीब ओबीसींनी हे समजून घ्यावे,’ असे आवाहन जरांगे यांनी केले.

Manoj Jarange Patil attacks Chhagan Bhujbal

मुंबईतील मराठा आंदोलनाबद्दल भुजबळ यांनी केलेल्या टीकेचाही जरांगे पाटलांनी समाचार घेतला. ‘मुंबईत मराठ्यांची पोरं गेली, महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली. मुंबईचे खरे मालक ही पोरं आहेत, तिथले लोक पाहुणे आहेत. हा इथे शोभत नाही, या जनावराला नेपाळ, नागालँड, इंग्लंड अशा ठिकाणी सोडायला हवे,’ अशा आक्रमक शब्दांत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला.

भुजबळ राजकारणासाठी ओबीसी समाजाला उलटं समजावून सांगत असल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केला. ‘याचं ऐकू नका, हा मेटाकुटीला आला आहे. आज डोळे लाल दिसू नयेत म्हणून त्याने काळा चष्मा घातला आहे,’ अशी टीका करत जरांगे यांनी भुजबळांना ‘विसरभोळा मंत्री’ असे नवे नाव दिले. मराठ्यांनी मर्दानगी दाखवून आतापर्यंत आरक्षण मिळवले असून, १९९४ साली वेडावाकडा जीआर काढायला भुजबळच कारणीभूत होते, असा दावाही जरांगे यांनी केला. या दोन्ही नेत्यांच्या वादामुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!