🕒 1 min read
मुंबई, ता. १६: मराठा आरक्षणावरून राज्यात निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असून, अनेक ओबीसी नेते कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला थेट सवाल केला.
‘तुम्हाला मिळालेलं १० टक्के EWS आरक्षण नको आहे का? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे अशी तुमची मागणी आहे, एक मराठा लाख मराठा असं तुम्ही म्हणता, मग तुम्हाला १० टक्के EWS आणि ओपनमधून मिळणारं आरक्षण नको आहे का? या प्रश्नांची सुज्ञ व्यक्तींनी उत्तरं द्यावीत,’ असे भुजबळ म्हणाले.
Chhagan Bhujbal Questions Maratha EWS Reservation
पुढे बोलताना भुजबळ यांनी आरक्षणासंदर्भातील कायदेशीर बाबींवरही भाष्य केले. ‘सर्वोच्च न्यायालयाने याआधीच मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करता येत नाही. तरीही सरकार हैदराबाद गॅझेटनुसार वाटेल तसे निर्णय घेत आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा निर्णयांनी अनेक संकटांना आमंत्रण मिळत आहे,’ असे भुजबळ म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला, असा आरोपही भुजबळांनी केला. ‘मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे तीन-चार दिवस मुंबई बंद होती. या दबावामुळेच आता ओबीसी समाजाचे आणि भटक्या विमुक्तांचे मोठे नुकसान होत आहे,’ असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. यामुळे मराठा आरक्षणावरून सुरू असलेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता असून, दोन्ही समाजांमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच ८ मंत्र्यांचे राजीनामे, भाजपला ११ वर्षांत पहिल्यांदाच धक्का
- ‘जय शहा त्यांच्या स्वकर्तृत्वावर बीसीसीआयचे अध्यक्ष झाले’, आशिष शेलारांचे मोठे विधान
- ‘देवाभाऊंच्या’ जाहिरातींवर उधळलेले करोडो रुपये शेतकऱ्यांसाठी दिले असते तर…; उद्धव ठाकरेंचा थेट सरकारवर हल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








