Share

‘देवाभाऊंच्या’ जाहिरातींवर उधळलेले करोडो रुपये शेतकऱ्यांसाठी दिले असते तर…; उद्धव ठाकरेंचा थेट सरकारवर हल्ला!

Uddhav Thackeray slams government for spending crores on ads instead of helping farmers.

Published On: 

BJP MLA Slams Uddhav Thackeray Rally Over Hindi Decision Reversal

🕒 1 min read

मुंबई, ता. १६: राज्यात परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘देवाभाऊ’ नावाच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळण्याऐवजी ती रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून दिली असती तर काय बिघडले असते, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

धाराशिवमध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर आणि सरकारच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले.

Uddhav Thackeray Criticizes Govt Over Farmer Relief Funds

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राज्यात अतिवृष्टी होतेय, ढगफुटी होतेय. सरकार फक्त पंचनामे करून मोजके पैसे वाटून मोकळे होणार का? शेतकऱ्यांचे नुकसान डोळ्यासमोर दिसत असतानाही तुम्ही पंचनामे झाल्यावरच मदत देणार का? सरकारने तातडीने, सरसकट काहीतरी रक्कम द्यायला काय हरकत होती?’ असा प्रश्न त्यांनी विचारला.

यावेळी ‘देवाभाऊ’ नावाच्या जाहिरातींवर खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ‘या जाहिरातींसाठी पैसे आले कुठून, याचा पंचनामा कोण करणार? छत्रपती शिवरायांच्या चरणी फुलं वाहतानाही कोट्यवधी रुपयांची जाहिरात केली जाते. एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी तुम्ही एवढा पैसा उधळू शकता, मग तोच पैसा शेतकऱ्यांना तातडीने दिला असता तर काय बिघडले असते?’ असा खोचक टोला त्यांनी लगावला.

सरकारकडे मदत देण्यासाठी पैसे नाहीत, हे सांगणाऱ्यांना ठाकरे यांनी पुन्हा एकदा सुनावले. ‘सरकारकडे पैसे आहेत, पण कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करता, ते याबद्दलच. त्या जाहिरातींची गरजच काय होती? त्याऐवजी सरकारने तातडीने मदत करायला हवी होती,’ असेही ते म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या