🕒 1 min read
मेघालय, ता. १६: मेघालयात मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर सत्ताधारी युतीतील ८ मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील ‘मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्स’ (MDA) सरकारमध्ये झालेल्या या मोठ्या राजकीय घडामोडींनी सर्वांनाच धक्का बसला आहे.
मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी (NPP), युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP), हिल स्टेट्स पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (HSPDP) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) या पक्षांच्या मंत्र्यांचा समावेश आहे. एनपीपीचे अम्पारीन लिंगदोह, कॉमिंगोन यम्बोन आणि रक्कम ए. संगमा, यूडीपीचे अबू ताहीर मंडल, पॉल लिंगदोह आणि किरमेन शायला, एचएसपीडीपीचे शकलियार वारजरी आणि भाजपचे के.ए.एल. हेक यांनी राजीनामे दिले आहेत.
Meghalaya Ministers Resign
मेघालयमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. हा विस्तार युतीमधील सर्व घटक पक्षांना योग्य प्रतिनिधीत्व देण्यासाठी आणि सरकारची स्थिरता कायम ठेवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे, आता राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची खाती नव्या नेत्यांना दिली जातील. मेघालयमध्ये एकूण ६० जागा असून, २०२३ च्या निवडणुकीनंतर ही युती सत्तेवर आली होती. कोनराड संगमा यांच्या सरकारमध्ये एकूण १२ मंत्री होते, त्यापैकी आता ८ जणांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनामा सत्रामुळे मेघालयच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, सरकारची पुढील वाटचाल कशी असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘जय शहा त्यांच्या स्वकर्तृत्वावर बीसीसीआयचे अध्यक्ष झाले’, आशिष शेलारांचे मोठे विधान
- ‘देवाभाऊंच्या’ जाहिरातींवर उधळलेले करोडो रुपये शेतकऱ्यांसाठी दिले असते तर…; उद्धव ठाकरेंचा थेट सरकारवर हल्ला!
- बंजारा समाजात नाराजी, धनंजय मुंडे म्हणाले, ‘मी फक्त…”; वादग्रस्त वक्तव्यावर केला मोठा खुलासा!









