Yogesh Kadam । पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकामध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेची संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय सावकारे यांनी स्वारगेट या प्रकरणावर भाष्य करताना असंवेदनशील वक्तव्य केले आहे.
मंत्री संजय सावकारे यांच्या विधानावर शहाजी बापू पाटील म्हणाले की, “कोणतीही महिला ही कुणाचीतरी माता, बहीण किंवा मुलगी असते, आणि ती या सृष्टीची तारणहार असते. अशा महिलांचा आदर करणे आवश्यक आहे, आणि त्यांच्याबद्दल असे वादग्रस्त विधान करणे योग्य नाही.”
मंत्री योगेश कदम यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, “योगेश कदम हे तरुण मंत्री आहेत आणि अधिकाऱ्यांच्या माहितीवर आधारित ते बोलले असू शकतात, परंतु या प्रकरणात गोंधळ झाला नाही, असे म्हणण्यापेक्षा त्या मुलीवर आरोपीने अत्याचार करत असताना ती त्याला विरोध करण्यासाठी प्रचंड दबाव टाकला असेल. अत्याचारापेक्षा कोणतीही मुलगी आपला जीव वाचवण्यासाठी सर्वप्रथम प्राथमिकता देईल.”
पाटील यांनी असेही स्पष्ट केले की, “योगेश कदम यांचे वक्तव्य बालिश आहे, तरीही मी विश्वास ठेवतो की ते आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी मंत्री कदम प्रयत्न करतील.” शहाजी बापू पाटील यांनी महिलांविषयी आदर आणि संवेदनशीलता राखण्याचा सांगितले आहे.
Sanjay Raut यांनी खासदारकीची काळजी करावी
राजकारणातील बुद्धी भ्रष्ट झालेला माणूस म्हणजे संजय राऊत, संजय राऊतने आपल्या खासदारकीची काळजी करावी पुन्हा आयुष्यात आमदारही नाही आणि खासदारही नाही त्यामुळे निवांत आता नारळाच्या झाडाखाली पुस्तक वाचत बसावे असा टोला शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
Sanjay Savkare काय म्हणाले?
वस्त्रोद्योग मंत्री, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी या घटनेबाबत असंवेदनशील वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले,असं म्हणता येत नाही एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही, असं म्हणता येत नाही. देशात म्हणाल तर घटना घडत असतात, कारवाई सातत्यानं चालू राहते. महिला असो की पुरुष असो सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत. फक्त महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, पुरुष नको असं नाही.सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत या दृष्टीनं कुठलंही शासन प्रयत्न करत असते. गुन्हेगार वृत्ती कुठेना कुठे प्रत्येक ठिकाणी असते, गुन्हेगार असल्यानं या गोष्टी घडत असतात, शासन कारवाई करण्याचं काम करत असते, असं संजय सावकारे म्हणाले.
गृहराज्यमंत्री Yogesh Kadam काय म्हणाले?
“विकृत विचाराचा पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो. काहीतरी दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची आपल्याला माहिती आहे. परंतु, अशावेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतंही युक्तिवाद, कुठलंही फोर्स, असं काही घडलेलं नाही. जे काही घडलंय ते अतिशय शांतपणे झालेलं आहे. तिथे आरडाओरडा सुरू आहे, हाणामारी झालेली आहे, असं काहीच घडलेलं नाही. ज्यावेळी आरोपी ताब्यात येईल, तेव्हाच आपल्याला माहिती मिळेल”
Suresh Dhas आणि Walmik Karad चे संबंध
राजकारणात संबंध कोणाचे कोणाशिही असू शकतात सुरेश धस आणि वाल्मीक कराडचे संबंध असू शकतात परंतु वाल्मीक कराडच्या घाणेरड्या कृत्यांना सुरेश धस यांचा पाठिंबा असेल असे आपण म्हणू शकत नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांचा आहे. ते निश्चितपणे योग्य वेळी तो निर्णय घेतील, असा विश्वास आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या