Walmik Karad । संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा (Santosh Deshmukh murder case) वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. सध्या त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे. नुकतेच देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय.
आधीच अडचणीत आलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वाल्मिक कराडचे पोलिसांनी तीन आयफोन जप्त केले होते. पण त्याने या फोनमधील डेटा केला होता. आता हाच डेटा रिकव्हर करण्यास पोलिसांना मोठे यश आले आहे.
या फोनमधून वाल्मिक कराड बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडला त्याचे चेले अण्णा आणि सोशल मीडियावर त्याला पंटर किंग म्हणायचे. महत्त्वाची बाब म्हणजे कराडकडे तीन महागडे आयफोन (Walmik Karad iPhone) होते.
वाल्मिक कराड सध्या गोल्डन रंगाचा आयफोन 16 प्रो वापरत होता. इतकेच नाही तर त्याच्याकडे एक गोल्डन रंगाचा आयफोन प्रो 13 आणि फिक्कट निळ्या रंगाचा आयफोन 13 प्रो होता. किमतीचा विचार केला तर गोल्डन रंगाच्या आयफोन 16 प्रो ची किंमत तीन लाखापर्यंत आहे.
Walmik Karad use luxury iPhone series
तर इतर फोनची किंमत दीड ते दोन लाखांच्या घरात आहे. सध्या हे फोन पोलिसांकडे तपासासाठी आहेत. या फोनमधून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे पुरावे पोलिसांच्या हाती लागले तर तपासाला वेगळे वळण मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :