Sanjay Shirsat । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या 9 डिसेंबर 2024 रोजी झाली होती. या हत्याप्रकरणाला 3 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला तरीही आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडत नाही.
फरार असलेल्या कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत. अशातच आता मंत्री संजय शिरसाट यांनी त्याच्याबद्दल वेगळीच भीती व्यक्त केली आहे. “कृष्णा आंधळे (Krishna Andhale) जिवंत आहे की नाही हा मला डाऊट आहे. पोलीस त्याचा तपास करत असून पण तो सापडत नसल्याने त्याचा खून झाला असावा,” अशी शंका संजय शिरसाट यांनी केली.
तसेच त्यांनी आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबाबद्दलही वक्तव्य केले. “संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) कोणालाही सोडणार नाही. यात धनंजय मुंडे यांचे नाव नसल्याने कारवाई करणं योग्य नाही. पण तपासात थोडे जरी आढळून आले तर कारवाई केली जाईल,” असे सूचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले.
“समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांना झेंडू बामचा तडका देणार आहे. ओवेसी असेल किंवा अबू आझमी हे विष कालवण्याचे काम करत आहेत,” असा गंभीर आरोप देखील संजय शिरसाट यांनी यावेळी केला आहे.
Sanjay Shirsat criticize Uddhav Thackeray and Rahul Gandhi
“उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी छावा चित्रपट बघायला हवा. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बॉडी बिल्डिंग आणि भारत जोडो पासून सुटका मिळाली आहे. आता ते इव्हेंट म्हणून धारावीच्या लोकांकडे बघत आहेत,” असाही टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका