Jaykumar Gore । राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर विरोधकांनी एका महिलेला नग्न फोटो (Jaykumar Gore Photos) पाठवल्याचा आरोप केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी जयकुमार गोरे यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
अशातच आता गोरे यांच्या अडचणी वाढू शकतात. जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात पीडित महिलेने माझी बदनामी होत असल्याने 17 तारखेपासून उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच या पीडित महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Jaykumar Gore case)
“जयकुमार गोरेला 2019 साली शपथविधीसाठी केस आडवी येत असल्याने त्यांनी मला प्रेशर आणलं होते. आम्ही तुम्हाला जीवे मारु तसेच कुटुंबाला त्रास देऊ, अशी धमकी मला दिली होती. त्यामुळे मी ऑक्टोबर 2019 मध्ये केस मागे घेतली,” असा दावा पीडित महिलेने केला आहे.
“मागील दोन दिवसांपासून आणखी एक महिला माझ्या संपर्कात असून तिचं नाव सांगणार नाही. जयकुमार गोरे यांच्याबाबत माझं जे मत आहे, तेच तिचंही मत आहे. ती दोन दिवसांत माध्यमांसमोर येऊन गोरे यांच्याबाबत बोलेल,” असा दावा पीडित महिलेने केला आहे.
Jaykumar Gore Photo Controversy
“जर जयकुमार गोरे निर्दोष असे तर त्यांना 10 दिवस तुरुंगात का ठेवलं? मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज का फेटाळला? सातारच्या कोर्टात देखील अटकपूर्व जामीन का फेटाळला? पोलीस ठाण्यात उपस्थित राहिल्यावर गोरेला जामीन मिळाला. मी उपकार करुन सोडलं आणि तू मलाच पु्न्हा त्रास द्यायला लागला,” असा घणाघात पीडित महिलेने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :