Devendra Fadnavis । मराठी भाषेवर वक्तव्य करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या वक्तव्याप्रकरणी विरोधकांनी भैय्याजी जोशी आणि भाजपला धारेवर धरले आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच असून महाराष्ट्रात येणाऱ्यांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे. मी अजून भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य ऐकलेले नाही, त्यामुळे ते पूर्ण ऐकून मी त्यावर बोलेन,” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “आमची आणि सरकारची भूमिका काय आहे तर मुंबईची, महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे. प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा बोलता आली पाहिजे. माझ्या वक्तव्याबाबत भैय्याजी जोशी यांचे काही दुमत असेल असे मला वाटत नाही,” असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
Raj Thackeray criticize Bhaiyyaji Joshi
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही,” अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) समाचार घेतला आहे.
Sanjay Raut criticize Bhaiyyaji Joshi
तसेच खासदार संजय राऊत यांनीही भैय्याजी जोशी यांच्यावर निशाणा साधला आहे. “भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी शिकणे गरजेची नाही या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे सत्तेत बसलेले मिधें कुठे आहेत ते? त्यांनी हिम्मत असेल या वक्तव्याचा निषेध करावा,” असे आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :