Share

IPL 2025 मध्ये बीसीसीआयने लागू केला नवा नियम, खेळाडूंना मिळणार नाही ‘या’ सुविधा

BCCI has implemented new rules before the start of IPL 2025. If players violate these rules, they may have to pay a fine.

by MHD

Published On: 

BCCI implements new rule in IPL 2025

🕒 1 min read

IPL 2025 । येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या पर्वाला (IPL) सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचे वेळापत्रकही (IPL Schedule 2025) जाहीर केले आहे. यंदा होणाऱ्या हंगामामध्ये कोणत्या संघाला विजेतेपद मिळते? याकडे आतापासूनच चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

अशातच आयपीएल सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने नवीन नियम (BCCI new rule) लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार खेळाडूंना सामन्यानंतर होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये स्लीव्हलेस जर्सी आणि फ्लॉपी हॅट्स घालता येणार नाही. जर खेळाडूने पहिल्यांदा हा नियम मोडला तर त्याला इशारा दिला जाईल, पुन्हा तीच चूक झाली तर दंड आकारण्यात येईल.

सामन्यांमध्ये खेळाडूंना मिळणारी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप पहिल्या दोन षटकांसाठी घालणे आवश्यक आहे. त्यानंतर खेळाडूला हवे असल्यास कॅप बदलता येईल. पण त्याला कॅप न घालता मैदानावर जाता येणार नाही.

सामना सुरु असताना खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना सीमारेषेजवळील एलईडी बोर्डांसमोर बसता येणार नाही. प्रत्येकाला डगआउटमध्ये असणे बंधनकारक केले आहे. इतकेच नाही तर कोणत्याही खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा जवळच्या मित्रांना ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळणार नाही आणि सर्व खेळाडूंना टीम बसमधून प्रवास करावा लागणार आहे.

New rule in IPL 2025

सर्व संघांना सराव क्षेत्रात 2 नेट आणि 1 साईड विकेट मिळणार आहेत, त्या ठिकाणी संघांना रेंज हिटिंग करता येईल. समजा दोन्ही संघ मुंबईच्या मैदानावर एकाच वेळी सराव करत असल्यास संघांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळतील. त्यांना ओपन नेट सेशनला परवानगी नसेल आणि एखाद्या संघाने सराव लवकर संपवला तर दुसऱ्या संघाला सरावासाठी विकेट वापरण्याची परवानगी मिळणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)