Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) दोन दिवसांनंतर तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. दररोज याप्रकरणी अनेक खुलासे होत आहेत.
अशातच आता तपासादरम्यान पोलिसांनी आणखी एक खुलासा केला आहे. संतोष देशमुख यांना हत्येच्या तीन दिवस आधीच टीप मिळाली होती. तरीही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. जर त्यांनी तेव्हाच योग्य तो निर्णय घेतला असता तर त्यांचा जीव वाचला असता, अशी माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. नुकतेच देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली असून वाल्मिक कराड (Walmik Karad) हा या हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे.
देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर येताच अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Dhananjay Deshmukh statement about Santosh Deshmukh murder case
अशातच धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी या प्रकरणाचा पार्ट-2 सुरू झाला आहे. स्वत: ला निर्दोष समजणाऱ्यांविरोधात आपण पुरावे समोर आणणार आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे आता धनंजय देशमुख यांचा रोख कोणावर आहे? याची चर्चा सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :