Manoj Jarange । जालना जिल्ह्यातील भोकरदन गावात कैलास बोराडे यांना मंदिरात प्रवेश केल्याने झालेल्या मारहाणीच्या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कैलास बोराडे अनवा गावातील मंदिरात शिरल्याच्या कारणावरून त्यांना लोखंडी सळईने चटके देत अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र, आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाचा वेगळा पैलू मांडला आहे.
मनोज जरांगे यांनी कैलास बोराडे यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आणला असून, त्यात ते अर्धनग्न आणि मद्यधुंद अवस्थेत मंदिरात शिरल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात मकोका कायद्यासारखा नवीन कायदा लागू करावा. त्यांनी सरकारला आवाहन केले की, विधिमंडळाच्या अधिवेशनात हा कायदा मंजूर करावा.
Chhagan Bhujbal यांच्यावर टीका
कैलास बोराडे प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केल्यावर मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, “या प्रकरणात जातीवाद आणला जात आहे. आम्ही इतर घटनांकडे जातीच्या चष्म्यातून पाहत नाही, त्यामुळे या मुद्द्यावरही तसा दृष्टिकोन ठेवला जावा.”
Manoj Jarange यांची सरकारवर टीका
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा सरकारला आठवण करून दिली. त्यांनी म्हटले की, “कुणबी प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्वरित कारवाई करावी.” तसेच, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले गेले होते, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या