बीड । जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh, Sarpanch of Massajog ) यांच्या हत्येने राज्यभर खळबळ माजवली आहे. 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने आता न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
अपहरणानंतर तब्बल तीन तास आरोपींनी संतोष देशमुख यांना निर्दयपणे मारहाण केली. एवढेच नाही, तर या अमानुष अत्याचारांचे 15 व्हिडीओ आणि 8 फोटो आरोपी महेश केदारने ( Mahesh Kedar ) आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. हे सर्व पुरावे सीआयडीने जप्त केले असून, या क्लिप्समध्ये सुदर्शन घुलेसह इतर आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
Santosh Deshmukh was brutally beaten three hours
सीआयडीच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे की, संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्वनियोजित कटाचा भाग होती. सीआयडीच्या आरोपपत्रानुसार, वाल्मिक कराड ( Valmik Karad was the mastermind behind this murder ) हा या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंड होता. संतोष देशमुख यांनी खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. 29 नोव्हेंबर रोजी केज येथील कार्यालयात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांची बैठक झाली होती. याच बैठकीत देशमुख यांना संपवण्याचा कट रचण्यात आला.
हत्येच्या आदल्या दिवशी, 8 डिसेंबर 2024 रोजी, चाटे, घुले आणि इतर आरोपी चांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे भेटले. त्यावेळी सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडचा निरोप दिला. “संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा.”
सीआयडीच्या तपासात आरोपी महेश केदारच्या मोबाईलमधील 15 व्हिडीओ आणि 8 फोटो उघडकीस आले. यात देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचे स्पष्ट पुरावे सापडले आहेत. या अमानुष मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या धक्कादायक खुलास्यांमुळे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले असून, आता पुढील न्यायप्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या