🕒 1 min read
Devendra Fadnavis । सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे, या अधिवेशनामध्ये विरोधक सरकारला विविध कारणांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे सभागृहात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) प्रोजेक्टसना स्थगिती दिल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
“काही झालं तर एकनाथ शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली, असं माध्यम चालवतात. ही पेड बातमी असून कामाला स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाही. प्रत्येक निर्णय आम्ही तिघे मिळून निर्णय घेत असतो. आम्ही चर्चा करूनच स्थगिती दिली आहे. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरी माझ्यावर ठपका,” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यातील सिंचन प्रकल्पाची माहिती दिली. “मागील काही वर्षात आपण राज्यात सिंचनाच्या क्षेत्रात मोठे काम करत आहे. १६० प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता दिली असून सिंचनाचे प्रकल्प वेगाने सुरु आहोत. राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार-२ ही योजना आणली. नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाची निविदा काढली,” अशी घोषणा फडणवीसांनी केली.
Devendra Fadnavis statement about stay order on Eknath Shinde approve Project
ते पुढे म्हणाले की, “क्वॉलिटी ऑफ इंडियाची नेमणूक केली असून ती प्रत्येक खात्याचं मूल्यमापन करणार आहे. 100 दिवसात किती काम केलं? त्याचा इंडेक्स तयार करू. ज्यांना 50 पेक्षा कमी मार्क मिळतील, त्यांना निगेटिव्हमध्ये टाकू आणि 1 मे रोजी चांगलं काम करणाऱ्या खात्याचा गौरव केला जाईल,” अशीही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या :
- चिल्लर प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतायेत? Sanjay Raut यांचा घणाघात
- शक्तिपीठ महामार्गाऐवजी मंदिरांच्या विकासासाठी निधी द्या; Satej Patil यांची मागणी
- ‘त्या’ लोकांची नसबंदी करा; Udayanraje Bhosale यांची सरकारकडे मोठी मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











