बीड । संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी ( Santosh Deshmukh Murder Case ) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मारहाणीच्या दरम्यान ‘बोलsss सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे’ असे ओरडत देशमुख यांना अमानुष मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सीआयडीने आरोपी महेश केदारच्या मोबाईलमधून 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त केले आहेत. या व्हिडीओंमध्ये संतोष देशमुख यांना तीन तास बेदम मारहाण केली जात असल्याचे दिसून येत आहे. या अमानुष मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सीआयडीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Sudarshan Ghule and other accused brutally beating to Santosh Deshmukh
तपासानुसार, वाल्मिक कराड हा या हत्येचा मुख्य सुत्रधार आहे. 29 नोव्हेंबर रोजी केज येथे झालेल्या बैठकीत संतोष देशमुख यांना संपवण्याचा कट रचण्यात आला होता. आरोपींनी 9 डिसेंबरला देशमुख यांचे अपहरण करून त्यांना तीन तास अमानुष मारहाण केली. हत्येच्या आदल्या दिवशी, 8 डिसेंबर रोजी, चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपींनी हॉटेल तिरंगा, चांदूर फाटा येथे बैठक घेतली होती. त्या वेळी घुलेने कराडचा निरोप देत सांगितले “संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा.”
या नव्या व्हिडीओमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. देशमुख यांच्यावर झालेल्या क्रूर अत्याचारांनी नागरिक आणि राजकीय वर्तुळ हादरले आहे. सीआयडीच्या तपासामुळे या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, आता आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या