Anjali Damania । सीआयडीने कोर्टात सादर केलेल्या दोषारोपपत्रामध्ये मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा (Santosh Deshmukh) मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
यामुळे वाल्मिक कराड आणि इतर आरोपींबाबत राज्यात संतापची लाट उसळली आहे. या आरोपींबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर काही फोटो शेअर करत वाल्मिक कराड याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
Anjali Damania post on X
अंजली दमानिया X वर लिहितात,”वाल्मिक कराडकडून 15 लाखाची खंडणी शिवराज बांगर यांनी वसुल केली होती असा FIR बाहेर आला आहे. वारंवार समक्ष भेटून व व्हॉट्सअप कॉल वरून, “पैसे दे नाहीतर तुला मारून टाकिन” अशी धमकी शिवराज बांगर (Shivraj Bangar) याने दिली आणि 15 लाख कराडच्या सांगण्यावरून, जगमित्रच्या लॉकरमधून देण्यात आले? कराडला कोणी धमकी देऊ शकत होत हे माझ्या बुद्धीला पटत नाही,” असे दमानिया म्हणाल्या.
अंजली दमानिया यांनी केलेल्या पोस्टमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इतरांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वाल्मिक कराड यालादेखील शिवराज बांगर याने जीवाची धमकी देत तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी वसूल केली होती.
Anjali Damania criticize Walmik Karad
खंडणीखोर वाल्मिक कराडने देखील आपल्या जीवाला घाबरून शिवराज बांगरला खंडणी दिली होती, अशी माहिती अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :