📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

शिखर धवन ४०व्या वर्षी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर; ‘ही’ विदेशी सुंदरी झाली भारताची सून!

माजी भारतीय क्रिकेटर शिखर धवनने आयर्लंडच्या सोफी शाईनसोबत लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Published On: 

Shikhar Dhawan Marriage: गब्बरची नवी इनिंग!

🕒 1 min read

क्रिकेटच्या मैदानात आपल्या धडाकेबाज खेळीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या ‘गब्बर’ने आता आयुष्याच्या एका नव्या इनिंगला सुरुवात केलीये. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंय!

भारतीय संघाचा माजी स्टार सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) वयाच्या ४०व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. आयर्लंडची लेक असलेली सोफी शाईन आता अधिकृतपणे भारताची सून झाली आहे. स्वतः शिखरनेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना हा सुखद धक्का दिलाय.

Shikhar Dhawan Marriage

‘मिस्टर अँड मिसेस धवन’ अशी गोड कॅप्शन देत शिखरने लग्नाचे काही अतिशय सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. फुलांनी सजलेल्या भव्य स्टेजवर, पांढऱ्या रंगाच्या आकर्षक आऊटफिटमध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, शिखर सोफीच्या भांगात कुंकू भरत असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पण ही विदेशी सुंदरी सोफी शाईन नेमकी आहे तरी कोण? सोफीचा जन्म जून १९९० मध्ये आयर्लंडमधील लिमरिक येथे झाला. ती केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर अबू धाबीमधील एका प्रतिष्ठित कंपनीत ती सेकंड व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मोठ्या हुद्द्यावर काम करते.

हे दोघे गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान त्यांना पहिल्यांदा एकत्र स्पॉट केलं गेलं, आणि तेव्हापासूनच या नात्याची जोरदार चर्चा होती. अखेर शिखरच्या वाढदिवशी सोफीने स्वतः एक पोस्ट करत या नात्याची जाहीर कबुली दिली होती. आता या नव्या पर्वासाठी गब्बरवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!