IND vs PAK । थोड्याच वेळात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेमधील (ICC Champions Trophy 2025) भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) हायव्होल्टेज सामना सुरु होणार आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वाचे या सामन्याकडे लक्ष आहे. दोन्ही संघांनी एक-एक सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाने आतापर्यंत एक सामना जिंकला आहे.
तर पाकिस्तानला आतापर्यंत एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. जर आजच्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीबाहेर पडू शकतो. त्यामुळे पाकिस्तानवर आजच्या सामन्यात दबाव असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जो संघ दोन सामने जिंकेल तो थेटपणे उपांत्य फेरीमध्ये सहज पोहोचणार आहे. त्यामुळे जर आज भारताने पाकिस्तानला पराभूत केले तर पाकिस्तानचे या स्पर्धेत पॅकअप होऊ शकते, असे चित्र पाहायला मिळत आहे.
बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असणाऱ्या आजच्या या सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पण सामना सुरु होण्याआधीच कोण जिंकणार हे निश्चित होईल हे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
या सामन्यातील विजयी संघ निश्चित करण्यासाठी टॉस फॅक्टर निर्णायक ठरणार असून दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये दव पडत नाही, त्यामुळे गोलंदाजीदरम्यान कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे टॉस कोणता संघ जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Team India for ICC Champions Trophy 2025
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
Team Pakistan for ICC Champions Trophy 2025
मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान, इमाम उल हक आणि सौद शकील.
महत्त्वाच्या बातम्या :