Champions Trophy । दुबईमध्ये आज यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हायव्होल्टेज सामना होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 8 महिन्यानंतर आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यांकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. (Champions Trophy 2025)
भारतीय संघाने (Team India) पहिल्या सामन्यात बांग्लादेशवर विजय मिळवला तर पाकिस्तानला (Pakistan) न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. जर आजच्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीबाहेर पडू शकतो.
याच कारणामुळे पाकिस्तानवर आजच्या सामन्यात दबाव असेल. प्रत्येक संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीत तीन सामने खेळावे लागणार आहेत. त्यांचा रनरेटही खूप कमी आहे. ग्रुप-ए मधील पॉइंट्स टेबलमध्ये भारतीय संघ +0.408 रन रेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड +1.200 रन रेटसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तान पॉइंट्स टेबल मध्ये चौथ्या स्थानावर आहे. अशातच जर भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला, तर हा पाकिस्तानचा हा दुसरा पराभव असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जो संघ दोन सामने जिंकेल तो थेटपणे उपांत्य फेरीमध्ये सहज पोहोचणार आहे. त्यामुळे जर आज भारताने पाकिस्तानला पराभूत केले तर पाकिस्तानचे या स्पर्धेत पॅकअप होऊ शकते, असे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात भारतीय संघाची प्लेईंग 11 कशी असणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
Team India for ICC Champions Trophy 2025
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या :