Share

मोठी बातमी! मस्साजोग नागरिकांच्या ‘त्या’ निर्णयामुळे Manoj Jarange यांना मोठा धक्का?

by MHD
Manoj Jarange Patil reaction on Massajog villagers support Suresh Dhas

Manoj Jarange । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) अजूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे मस्साजोगचे नागरिक येत्या 25 तारखेपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे देखील सहभागी होणार आहेत.

या हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका बजावली आहे. त्यापाठोपाठ भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनीदेखील सुरुवातीपासून आक्रमक भूमिका पार पाडली आहे. पण काही दिवसांपूर्वी धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली होती.

यामुळे जरांगे पाटील यांनी धस यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. अशातच आज धस यांनी मस्साजोगच्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी धस यांनी आपल्याला मस्साजोगच्या नागरिकांनी पाठिंबा दिला असल्याचे वक्तव्य केले आहे.

Manoj Jarange Patil on Suresh Dhas

यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. “त्या विषयी मला काही बोलायच नाही. कारण तो विषय माझ्यासाठी संपला आहे. मी इतका जीव लावला होता, समाजाने तळ हातावर घेतलं. इतक्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची काहीच गरज नव्हती,” अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

It is being said that Manoj Jarange Patil has got a big shock due to a decision of Massajog citizens.

Maharashtra Marathi News