🕒 1 min read
Sushma Andhare । मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या मागील काही दिवसांपासून अडचणीत भर पडली आहे. विरोधक सातत्याने या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले असल्याचे पाहायला मिळत आहे.
येत्या ३ मार्चपासून 3 मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. यामध्ये विरोधक या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला कोंडीत पकडू शकतात. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अधिकृत एक्स अकाउंटवर माणिकराव कोकाटे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर निशाणा साधला आहे.
Sushma Andhare post on X
सुषमा अंधारे X वर लिहितात, “माणिकराव कोकाटे प्रकरणांमध्ये नार्वेकर निकालाच्या प्रतीची वाट बघत आहेत मात्र 38 पानी निकाल ऑनलाईन उपलब्ध आहे. वकील असणाऱ्या नार्वेकरांना सहजासहजी उपलब्ध होत नसेल तर मी द्यायला तयार आहे. कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार? की त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे?,” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देणार आहेत. त्यामुळे नार्वेकर आव्हाड यांची मागणी मान्य करणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येदेखील विरोधक मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात. जर सरकारने या दोन्ही नेत्यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशनामध्ये विरोधक गदारोळ घालू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :
-
माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, Jitendra Awhad विधानसभा अध्यक्षांना देणार ‘ते’ पत्र
-
भारताकडून पराभव झाला तर पाकिस्तान होईल Champions Trophy तून बाहेर, कसं ते जाणून घ्या…
-
सावधान! Heart Attack येण्यापूर्वी महिलांमध्ये दिसू लागतात ‘ही’ लक्षणे









