Jitendra Awhad । मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावताच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल जितेंद्र आव्हाड विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना पत्र देणार आहेत.
येत्या 3 मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून या पार्श्वभूमीवर आज विधीमंडळ कामगार सल्लागार समितीची बैठक पडणार आहे. या बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाड हे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत.
सुनील केदार, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना एक वेगळा न्याय आणि सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना एक वेगळा न्याय का? असा प्रश्नदेखील जितेंद्र आव्हाड उपस्थित करणार आहेत. परंतु, समितीच्या या बैठकीला विरोधी पक्ष नेते पाठ फिरवणार आहेत.
Jitendra Awhad on Manikrao Kokate
दरम्यान, जितेंद्र आव्हाड हे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. त्यांची ही मागणी मान्य होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील विरोधक मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :