Manoj Jarange । राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) अजूनही धुसफूस सुरूच आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सतत आक्रमक भूमिका घेत असतात. अशातच आता मराठा आंदोलनात दरी निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
आज कोल्हापूरमध्ये मराठा समाजाची राज्यस्तरीय परिषद (Maratha Samaj State Level Council) पार पडत असून या परिषदेसाठी राज्यभरातून विविध 42 मराठा आरक्षण संघटनांचे पदाधिकारी, मराठा आरक्षण विषयावरील तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. परिषदेदरम्यान आरक्षणाबाबत प्रलंबित प्रश्न, पुढील भूमिका आणि दिशा ठरविण्यात येणार आहे.
परंतु, या परिषदेमधून मनोज जरांगे पाटील यांना वगळण्यात आले आहे, जरांगे पाटील यांच्याशिवाय ही बैठक पार पडत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मराठा आरक्षणात फूट पडली की काय? अशा चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
आज कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती विनायक मेटे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक, मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाषदादा जावळे-पाटील, शिवसंग्राम स्वराजचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे, राष्ट्रीय मराठा महासंघ मुंबईचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे, शंभुराजे युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुनील मोरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Maratha Reservation meeting will be in Kolhapur
दरम्यान, मराठा आरक्षण हा राज्यातील ज्वलंत मुद्दा असून चक्क कोल्हापूरमध्ये आज होणाऱ्या परिषदेला मनोज जरांगे पाटील हे उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. यावर जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :