Share

IPL 2025: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा पिकलबॉलचा खेळ सोशल मीडियावर व्हायरल, RCB चा bonding सेशन रंगात

Virat Kohli and Anushka Sharma play pickleball during RCB’s bonding session amid rain in Bengaluru. RCB eyes a top-two finish in IPL 2025 as playoffs approach.

Published On: 

IPL 2025: Virat Kohli and Anushka Sharma's pickleball game goes viral on social media, RCB's bonding session in color

🕒 1 min read

IPL 2025 प्लेऑफ्स अगदी जवळ आले असताना, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मैदानाबाहेर काही क्षण एन्जॉय करत पिकलबॉल खेळला. सततच्या पावसामुळे RCB चं ट्रेनिंग रद्द झाल्यानंतर हा इनडोअर bonding सेशन आयोजित करण्यात आला होता.

बेंगळुरूमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने RCB च्या बाह्य सराव सत्रांवर परिणाम झाला. त्यामुळे पिकलबॉलसारखा इंडोअर खेळ निवडण्यात आला. विराट आणि अनुष्का सोबतच RCB चे बॅटिंग कोच दिनेश कार्तिक आणि त्याची पत्नी व स्क्वॉशपटू दिपिका पल्लीकल देखील यात सहभागी झाले.

IPL 2025: Virat Kohli and Anushka Sharma’s pickleball game goes viral on social media, RCB’s bonding session in color

RCB च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये विराट अनुष्काला हाय-फायव्ह देताना दिसतोय. फिल सॉल्ट, मयंक अग्रवाल, भुवनेश्वर कुमार, जितेश शर्मा आणि लियम लिव्हिंगस्टोन हे खेळाडूही यात सहभागी झाले होते.

RCB चा प्लेऑफमध्ये प्रवेश, टॉप-2 साठी लढत कायम

RCB ने यंदाच्या मोसमात पाचव्यांदा IPL प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून सध्या गुजरात टायटन्स (18 पॉइंट्स) पाठोपाठ 17 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र पंजाब किंग्सकडेही 17 गुण आहेत, त्यामुळे टॉप-2 स्थानासाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. अंतिम क्रमवारी नेट रन रेट (NRR) वर अवलंबून असण्याची शक्यता आहे.

बेंगळुरूमधील पावसामुळे RCB चा 23 मे रोजी SRH विरुद्ध होणारा शेवटचा घरचा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर हलवण्यात आला आहे. 27 मे रोजी RCB चा शेवटचा लीग सामना LSG विरुद्ध देखील या मैदानावरच होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Cricket India IPL 2025 Maharashtra Marathi News Mumbai Sports

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या