🕒 1 min read
अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) आपल्या मुलांवर होणाऱ्या टीकेला नेहमी सडेतोड उत्तर देतो. यापूर्वी मुलगी अथिया शेट्टीबाबत ट्रोल करणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिलं होतं. आता मुलगा अहान शेट्टीवर सुरू असलेल्या टीकांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
अहान सध्या ‘बॉर्डर 2’ या देशभक्तिपर चित्रपटासाठी पूर्ण ताकदीनं काम करत आहे. या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने इतर चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. मात्र, या निर्णयावरून काही लोकांनी त्याच्या कास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली आहे.
Sunil Shetty anger! “If more rumors are spread, I will hold a press conference and expose everyone”
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले, “मी अहानला स्पष्ट सांगितलं होतं की तू हा चित्रपट निवडला आहेस, तर पूर्णपणे झोकून दे. यामुळे तुला आणि तुझ्या वडिलांना अनेक वर्षं लोक आठवत राहतील. मात्र, या निर्णयामुळे त्याच्यावर पेड आर्टिकल्स, अफवा, आरोपांचं पेव फुटलं. कोणी तरी मुद्दाम त्याच्याविरोधात कथा तयार करत आहे. ही सगळी परिस्थिती मी शांतपणे पाहत होतो, पण आता मला बोलावं लागलं आहे.”
सुनील पुढे म्हणाले, “जर ही नकारात्मक मोहीम थांबली नाही, तर मी थेट पत्रकार परिषद घेईन आणि संबंधित लोकांची नावं घेऊन त्यांना उघडं पाडेन.”
📌 महत्वाच्या बातम्या
- DC विरुद्ध विजयानंतर हार्दिक पांड्याचे वक्तव्य; रोहित शर्माचं नाव टाळत ‘या’ दोन खेळाडूंना दिलं श्रेय
- IPL 2025: अहमदाबादमध्ये GT विरुद्ध LSG सामना आज – महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये चुरस
- Bigg Boss 19 लवकरच सुरू होणार; सलमान खान पुन्हा एकदा शोचं सूत्रसंचालन करणार