Share

‘मला जबरदस्ती करू नका’; मराठी भाषेबाबत सुनील शेट्टीचं रोखठोक विधान

सुनील शेट्टीने मराठी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे. “मी मराठी बोलेन, पण मर्जीने. जबरदस्ती नको,” असे त्याने दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

Published On: 

Suniel Shetty on Marathi Language: 'जबरदस्ती नको', अण्णाचं मोठं विधान

मुंबईत राहून मराठी बोलायची की नाही, यावरून अनेकदा वाद होतात, राजकारण तापतं. आता या संवेदनशील विषयावर बॉलीवूडचा ‘अण्णा’ म्हणजेच सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. त्याने मराठी भाषेबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “मी मराठी बोलेन, पण माझ्या मर्जीने… माझ्यावर कोणी जबरदस्ती करू नका,” असं त्याने स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितलंय.

Suniel Shetty on Marathi Language

एका कार्यक्रमात सुनील शेट्टीला भाषेबाबत आणि त्याच्या ओळखीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने कोणतीही आडकाठी न ठेवता मत मांडलं. तो म्हणाला, “जर कोणी मला येऊन सांगितलं की मराठी बोलणं अनिवार्य आहे, तर मी स्पष्ट सांगेन की ते गरजेचं नाही. मी मराठी नक्की बोलेन, पण जेव्हा मला वाटेल तेव्हा. कृपया मला जबरदस्ती करू नका.” त्याच्या या विधानामुळे सध्या सिनेवर्तुळात खळबळ उडाली नसली तरी, विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सुनील शेट्टी मूळचा कर्नाटकातील मंगळुरूचा. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी खूप लहान वयात घर सोडलं आणि कर्नाटकातून बाहेर पडलो. पण याचा अर्थ असा नाही की मी माझी ओळख विसरलो किंवा दुसरं कोणीतरी बनण्यासाठी इथे आलो.” आजही माझ्या कामात, विचारांमध्ये आणि मूल्यांमध्ये मंगळुरूची झलक दिसते, असं त्याने अभिमानाने सांगितलं.

मुंबई ही आपली कर्मभूमी असल्याचं तो मानतो. मराठी भाषेचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. “मराठी भाषा शिकणे आणि बोलणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. पण ती गोष्ट आतून यायला हवी, दबावाने नाही,” असा सुरही त्याने आळवला. आता सुनील शेट्टीच्या या ‘डॅशिंग’ विधानावर मराठी प्रेमींकडून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही