Anil Parab । आज विधान परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी नाव न घेता मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर टीका केली आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“सध्या एक नेपाळी अंगावर शाल घेऊन फिरत असून तो मीच हिंदू धर्म वाचवू शकतो, असं सांगत आहे. पण हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. आम्ही दुसऱ्याच्या धर्मावर जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही, तशी आमची शिकवण आहे,” असा टोला परब यांनी लगावला.
“हल्ली काय झालं आहे की मांसाहार खायचं नाही, असं कोणीतरी म्हणत आहे. हा अधिकार त्यांना कोणी दिला आहे? मटण कोणते खायचे? झटका मटण खायचे की हलाल खायचे? हे आता आम्हाला तुम्ही सांगणार का?,” असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
Anil Parab has targeted Nitesh Rane
“एक मंत्री सांगतो की आपण काय खायचे आणि काय खायचे नाही. राज्यात हिंदू मुस्लिम वाद होतील असं वातावरण आहे. माझ्या सोसायटीत नेपाळी वॉचमन आहे, तो रात्रभर ओरडत असतो की जागते राहतो. त्याला वाटत त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहे,” असा चिमटा परब यांनी काढला.
महत्त्वाच्या बातम्या :