Narendra Modi । स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) एका वादात सापडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर वादग्रस्त गाणे सादर केल्याने महायुती सरकार आणि शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
कुणाल कामराने कॉमेडी शो केलेल्या मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता कुणाल कामराचा एक जुना व्हिडिओ (Kunal Kamra video) व्हायरल झाला आहे.
कुणाल कामराने या व्हिडिओमध्ये थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “हम होंगे कंगाल, एक दिन मन मै अंधविश्वास, देश का सत्यानाश हम होंगे कंगाल, एक दिन होगे नंगे चारो और, करेंगे दंगे चारो ओर पोलिस के पंगे चारो ओर, एक दिन मन मै नत्थुराम, हरकते आसाराम हम होंगे कंगाल, एक दिन होगा गाय का प्रचार, लेके हाथो मे हत्थियार होगा संघ का शिष्टाचार, एक दिन जनता बेरोजगार, गरीबी की कागार हम होंगे कंगाल, एक दिन,” असे त्याचं हे गाणं आहे.
बेरोजगारी आणि महागाई या सर्व मुद्द्यावर त्याने हे गाणे तयार केले होते. पण आता हे जुने गाणे सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. याप्रकरणी कुणाल कामरा याच्यावर कारवाई केली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Kunal Kamra criticizing Narendra Modi and Eknath Shinde
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तयार केलेल्या गाण्यामुळे कुणाल कामरा आधीच अडचणीत आला आहे. अशातच आता त्याचा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे कुणाल कामराच्या अडचणीत आणखी भर पडू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :