LSG । 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या (IPL) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येणार आहे. पहिल्याच सामन्यात कोणता संघ खातं उघडणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल. अशातच आता लखनऊ सुपर जायंट्ससाठी (Lucknow Super Giants) दिलासादायक बातमी आहे. (IPL 2025)
संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) हा एनसीएमध्ये आहे. तो पुढील काही आठवड्यांत लखनऊ सुपर जायंट्समध्ये सहभागी होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे आयपीएल 2024 त्याला अर्धवट सोडावी लागली होती. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सचं मोठं नुकसान झालं होतं.
त्यानंतर तो बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत दिसला होता. पण त्यानंतर त्याला पुन्हा एकदा दुखापत जाणवू लागली आणि त्याला बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीत उपचारासाठी पाठवले गेले. पण आता मयंक यादव पुन्हा फिट होण्याच्या मार्गावर आहे.
असे झाले तर लखनऊ सुपर जायंट्सला मोठा दिलासा मिळेल. संघाने त्याला 11 कोटी रुपये मोजून त्याला कायम ठेवले आहे. आता त्याच्याबाबत काही कन्फर्म नसल्याने त्याच्या जागी बदली खेळाडूही संघात घेता येत नाही.
ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात संघ यंदा आयपीएलचे विजेतेपद जिंकेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. यंदा संघात मोठे बदल पाहायला मिळत आहे. नवीन बदलाचा संघाला काही फायदा होईल का? याकडेही चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.
Lucknow Super Giants IPL 2025 Full Schedule
24 मार्च – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
27 मार्च – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
1 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
4 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
6 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
12 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
14 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
19 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
22 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
27 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
4 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
9 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
14 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
18 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
Lucknow Super Giants Squad 2025
ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसिन खान, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, एडेन मार्कराम, मिचेल मार्श, अवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुआल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, शाहबाज अहमद, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगकर, अर्शीन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रेट्झक.
महत्त्वाच्या बातम्या :