Narayan Rane । माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आज सहकुटुंब शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाबाबत महत्वाचं भाकीत केलं आहे. हा पक्ष संपत चालला असून पुढच्या निवडणुकीत हा पक्ष राहणार नसल्याचं नारायण राणे (Narayan Rane) यांनी म्हंटल आहे.
Narayan Rane Criticized Udhhav Thackeray
ते म्हणाले, “विकास , समृद्धी , लोकहीत हे त्यांचं काम नाही. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरे यांचं काम आहे. म्हणून पक्ष संपत चालला आहे. पुढच्या निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. सामाजिक, विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी 39 वर्ष त्यांच्या सोबत काम केलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता, साहेब गेले तेव्हा शिवसेना संपली.”
दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील नारायण राणे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “मी त्यांच वक्तव्य बघत बिघत काही नाही, मात्र त्यांनी जे मत व्यक्त केलं ते चुकीचं आहे”, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :