Girish Mahajan । एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावरून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संताप वाक्य केला आहे. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळ करतील, असं म्हणत महाजन यांनी खडसेंना इशारा दिला आहे.
Girish Mahajan Reaction On Eknath Khadse Allegations
“कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, “मला वाटतं त्यांच्याकडे एक जरी पुरावा असेल तर त्यांनी द्यावा. काहीतरी चरित्र हरण करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही. त्यांनी एक पुरावा दाखवावा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल.” अमित शहा यांना काय पुरावा दाखवता लोकांना दाखवा. यांना दिले, त्यांना दिले, माझ्या मोबाईल मध्ये होते डिलीट झाले, मोबाईल हरवला हे खोटं बोलताना लाज वाटत नाही का?”, असा संतप्त सवाल गिरीश महाजन यांनी केलाय.
मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळ करतील. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही मला बोलायला लावू नका, असं म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आरोपांवर आगपाखड केली.
महत्वाच्या बातम्या :