Share

Uddhav Thackeray गटाला खिंडार पडणार? ज्येष्ठ नेता साथ सोडणार?

Sanjay Shirsat has offered Uddhav Thackeray group leader Chandrakant Khaire to join his group

Uddhav Thackeray | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या अनुषंगाने पक्षसंघटना वाढवण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

Sanjay Shirsat’s open offer to Uddhav Thackeray group leader Chandrakant Khaire

आमच्या पक्षाचे दरवाजे चंद्रकांत खैरे यांच्यासाठी कायम उघडे असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांचं तोंडभरून कौतुक देखील केलं आहे. चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल मला कधीही राग नाही. त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली आहे. म्हणून त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे कायम उघडे आहेत, असं संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. खैरेंना अडचणीत टाकलं गेलं आहे. म्हणून मातोश्री सोडता येत नाही आणि इकडे कोणी जवळ करत नाही, अशी त्यांची अवस्था झालेली आहे, असंही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हंटलं आहे. यावर ठाकरे गटाकडून काही प्रतिक्रिया येतेय का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Shirsat has offered Uddhav Thackeray group leader Chandrakant Khaire to join his group.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now