Kunal Kamra । स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीच्या नेत्यांनी कुणाल कामराविरोधात (Kunal Kamra) टीकेची झोड उठवली आहे. यानंतर कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी अनेकदा समन्स बजावले. मात्र अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिलेला नाही. कुणालविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
Kunal Kamra has demanded cancellation of the FIR
उलट त्यानेच आता पोलिसांना पत्र पाठवत एक मोठी मागणी केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी त्याने पत्राद्वारे पोलिसांकडे केली आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरविरोधात कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली असल्याची माहिती समोर येतेय. कुणाल कामराकडून शनिवारी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :