Share

Tanisha Bhise मृत्यूप्रकरणी महिला आयोगाकडून पोलीस आयुक्त व मेडिकल काउन्सिलला कारवाईचे आदेश

Women’s Commission orders action to Police Commissioner and Medical Council in Tanisha Bhise death case.

Published On: 

Women's Commission orders action to Police Commissioner and Medical Council in Tanisha Bhise death case.

Tanisha Bhise । पुण्यात तनिषा भिसे (Tanisha Bhise) या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. या प्रकरणी शासकीय समितीच्या आधारे रूग्णालयाची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी अहवालातून देखील रुग्णालयावरच ठपका ठेवण्यात आला आहे.

त्यानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांनी राजीनामा दिला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयावर चौफेर टीका होत असताना रुग्णालयाने देखील एक अंतर्गत समिती नेमून चौकशी केली. या चौकशीचा अहवाल रुग्णालयाने सार्वजनिक केला होता.

Tanisha Bhise Death Case Update

तनिषा भिसे आणि कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक केल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास झाला असल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत महिला आयोगाने पुणे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. आयोगाने याप्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे आणि मा.अध्यक्ष,महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांना यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून आयोगास केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही