Supriya Sule | राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापलेलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये अनेक विषयांवरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच सध्याच्या घडीला एक बातमी समोर येतेय. भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अतिशय वाईट स्थितीमुळे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपोषण सुरू केले आहे.
Supriya Sule Hunger Strike
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषण सुरू केले आहे. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाची मागणी त्यांनी केली आहे. सध्या ऊन वाढत चाललं आहे. मी अन्न खाणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे भर उन्हात आंदोलन करण्यासाठी बसल्या आहेत.
“जोपर्यंत कामाचे वर्क ऑर्डर निघत नाही, काहीतरी धोरणामात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार आहे. जनतेनं विश्वास ठेऊन मला मतदान केलं आहे. आता ते मला दीड किलोमीटरचा रस्ता मंजूर करून देण्यासाठी मागणी करत आहेत. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी मी इथे बसले आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या .
महत्वाच्या बातम्या :