Abu Azmi । छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला आहे.
अशातच शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी “ज्या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे, त्याचं नाव खुलताबादवरून बदलून रत्नपूर ठेवावं”, अशी मागणी केली आहे. त्यावर आता समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे.
Abu Azmi reaction on the issue of renaming Khulatabad
“जुन्या शहराचे नाव बदलून काय होणार आहे? नवीन शहर वसवले तर फरक पडेल”, असे आझमी म्हणाले. जर शहराचं नामांतर करून देशातील कायदा-सुव्यवस्था, महागाई, बेरोजगारी कमी होणार असेल तर एका शहराचं नाही तर संपूर्ण देशाचे नाव बदला, आम्ही त्याचं स्वागत करू”, असं मत अबू आझमी (Abu Azmi) यांनी व्यक्त केलं आहे.
“देशातील बाकीच्या मुद्द्यांपासून लोकांनी भरकटलं जावं यासाठी नावं बदलण्याचा मुद्दा पुढे केला जात आहे. मात्र देशात विकासाची कामं झाली पाहिजेत. लोकांना खरा इतिहास देखील दाखवला गेला पाहिजे”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :